💥पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांचा प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश...!


💥जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश💥 

परभणी ; येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आज शनिवार दि.१२ मार्च २०२२ रोजी  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व जनशक्ती पक्ष पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते सुशील गायकवाड,नरेश जोगदंड,मंचक कुऱ्हे,सुरेश वाघमारे यांनी प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.


यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय वाघमारे म्हणाले राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याला पाहून मी आज प्रहारच्या प्रवाहात स्वतःला वाहून घेणार असे त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले तर प्रहार जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे बोलताना म्हणाले की आगामी निवडणुका मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या निवडणुकांमध्ये पूर्णा तालुका येथुनच सीटा निवडून येऊन प्रहारचे खाते खोलण्याचे काम पूर्णा तालुक्यात निश्चितच होईल अशी आपेक्षा त्यांनी व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या