💥जलदिवसाचे औचित्य साधून पत्रकार संघटनेच्या पाणपोईचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते संपन्न....!


💥उपविभागीय अधिकारी (राजस्व) वैशाली देवकर यांनी फित कापून उद्घाटन केले💥

शिवशंकर निरगुडे :- हिंगोली प्रतिनिधी 

आज दिनांक 21 मार्च ला दुपारी तहसील कार्यालयाच्या समोरील प्रांगणात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व एकता प्रेस क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी जल दिवसाचे औचित्य साधुन सर्व जनसामान्यांसाठी पाणपोई थंड पेयजल सर्वासाठी उपलब्ध व्हावे आणि  सर्वांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने पाणपोई लावण्यात आली.या पाणपोईचे उद्घाटन जळगांव जामोद उपविभागीय अधिकारी (राजस्व) वैशाली देवकर यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी  तहसीलदार शितल सोलाट,जळगांव जामोद पो.स्टे चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रमुख उपस्थितांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेली भरारी स्मरणिका प्रमुख पाहुण्यांना भेट देण्यात आली.


 

यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार शितल सोलाट,ठाणेदार सुनिल अंबुलकर,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख,आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक माजी नगरसेवक निलेश शर्मा, अभिमन्यू भगत, मंगेश राजनकर,देविदास तायडे,अश्विन राजपुत, मनिष ताडे,राजेश बाठे,दत्तु दांडगे, गणेश भड,अनिल भगत, अमोल भगत, विठ्ठल गावंडे, अमर तायडे,गणेश गायकी,सचिन कल्याणकर,गजानन चोपडे,गजानन राजपुत, विजय वानखडे,सुरेश कलंत्री,प्रदिप भागवत,संजय देशमुख, रंगराव देशमुख,शमीम देशमुख,बाबुराव इंगळे,जलसंपदा विभागाचे कर्मचारी मनिष राजगुरे,रुपेश चावकर,संतोष ताडे,करणसिंग राजपुत, सुनिल ठाकुर,अ.का.नितीन गोर्हे,तहसिल शिपाई भोजने ताई,ओंकार वानखडे,श्रीकांत आव्हेकर,यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या