💥एनसीसी विद्यार्थ्यांकडून टाकाऊपासून टिकाऊ पाणीपात्राची निर्मिती...!


💥जागतीक चिमणी दिन : छतावर पाणीपात्र ठेवण्याचे आवाहन💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.१९ मार्च) - जागतीक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमिवर लोकांमध्ये पक्षांप्रती संवेदना जागृत व्हावी या उदात्त हेतूने श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांनी कला व एनसीसी शिक्षक अमोल काळे यांच्या पुढाकारात चिमणी व इतर मुक्या पक्षांना पिण्यासाठी पाणीपात्राची निर्मिती केली. यासाठी विद्यार्थ्यांना ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोलाचे कमांडिंग ऑफीसर लेफ्टिनेंट कर्नल चंद्रा प्रकाश बदोला यांचे मार्गदर्शन लाभले.

    रखरखत्या उन्हाळ्यात मुक्या पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक पक्षी पाणी न मिळाल्याने आपला जीव सोडतात. आजच्या डिजीटल युगात मोबाईल टॉवरची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा एक भाग असणार्‍या पक्षांची संख्या कमी झाली आहे. या सर्व कारणामुळे पक्षांना अन्न, पाणी व निवारा मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेवून जागतीक चिमणी दिनी एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी क्राफ्ट वर्क पाणीपात्र-अन्नपात्र स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून टाकाऊ वस्तुंपासून पाणीपात्र व अन्नपात्र बनविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका कवळकर, द्वितीय शशांक बल्लाळ, तृतीय रोशनी खंडारे यांना मिळाले. स्पर्धेत एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात रूचिता वानखेडे, वैष्णवी मापारी, दिशा व्यवहारे, योगिनी धनगर, वैष्णवी मते, सृष्टी कुटे, ऋतुजा राऊत, नंदिनी वानखेडे, तनुजा गवळी, समृद्धी वानखडे, संपदा रंगभाळ, दुर्गा नालेगावकर, शरयू आळणे, दिव्या पाईकराव, मुक्ता वानखडे, तृप्ती वानखडे, वेदांती वाघ, कृष्ण कदम, प्रेम तेलगोटे, दिगंत उल्हामाले, पार्थ खोटे, जय वानखेडे, प्रसाद पंडितकर, यश हेन्द्रे, प्रणव कांबळे, आनंद वाघमारे या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती घोषित करण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक बबराव बिल्लारी, उपमुअ दंभीवाल सर, पर्यवेक्षीका सौ. भोंडे व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या