💥आदिवासी कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध - ज.मो.अभ्यंकर


💥समाजाचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे ही श्री.अभ्यंकर म्हणाले💥

पूर्णा (दि.२६ मार्च) - परभणी येथील 'हॉटेल सिटी पॅलेस' येथे दि.२५ मार्च २०२२ रोजी मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या प्रश्नांवर अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मा.ज.मो.अभ्यंकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातील साधारणता ६० समाज बांधव उपस्थित होते. यावेळी समाज बांधवांच्या वतीने जाती जमाती व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा.ज.मो.अभ्यंकर यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले यावेळी व्यासपीठावर शिक्षक सेनेचे विभागीय सचिव तथा जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब राखे , जेष्ठ समाजसेवक वैजनाथ मेघमाळे, निवृती रेकडगेवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती..

यावेळी बैठकीचे प्रास्ताविक आदिम चे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिट्ठलवाड म्हनाले की मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या बाबतीत  ब्रिटिशकालीन व निजामकालीन 1950 पूर्वीच्या पुराव्यांचा संदर्भ देत बालाघाट महादेव डोंगर रांगा हे कोळी महादेव जमातीचे पारंपारिक वस्तीस्थान व तत्कालीन निजाम राज्यात कोळी जमाती अंतर्गत कोळी महादेव आणि मल्हार कोळी या दोन्ही जमाती राहत असल्या बाबतचे विविध ऐतिहासिक संदर्भ दिले.आणि आदिवासी विभाग आणि पडताळणी समिती,प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने या जमातीवर कसा अन्याय करतो, आणि आदिवासी विभागाच्या जात पडताळणीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आणि कटकारस्थान कारस्थानामुळे मुद्दाम अवैध ठरवलेल्या कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला  मा. उच्च न्यायालयाने  हजारो वैधता दिल्याचे सांगून पडताळणी समितीच्या चुकीच्या कामाचा बोजा मा उच्च न्यायालय वर पडत असून अशा प्रकरणांची संख्या जवळपास 30 टक्के झाली आहे असे सांगून यावर आयोगाने लक्ष घालून या जमातीवरील अन्याय दूर करावा अशी विनंती केली.


तसेच बी डी बंडेवाड यांनी मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय ने दिलेल्या निर्ण याचे संदर्भ देत आदिवासी विभाग न्यायालयाचा अवमान करत असल्याचे सांगताना  1980 नंतर आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी विविध परिपत्रके काढून घटनात्मक तरतुदीचा भंग केला असल्याचे सांगितले. त्याच बरोबर आदिवासी संचालक गोविंद गारे  यांनी कसी प्राचीन संदर्भाची मोडतोड करून कसे चुकीचे लिहिले संविधानाची व संसदेच्या कायद्याची पायमल्ली केली असून त्या बाबत सत्यता पडताळून न्याय द्यावा अशी मागणी केली यावेळी आयागाचे अध्यक्ष मा.ज. मो. अभ्यंकर साहेब यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना आपण दिलेले सविस्तर निवेदन मी अभ्यास करून त्यात आपल्या  कोळी महादेव कोळी मल्हार या जमाती ला न्याय मिळून देण्यासाठी सर्व तरतुदींचा संविधानात्मक कलमांचा वापर करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यासाठी गरज लागत असेल तर  आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेईल.. जर अन्याय झालेला असेल तर आदिवासी मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन. गरज असेल तेव्हा संघटनेच्या प्रतिनिधींना सुनावणीसाठी आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात येईल असे स्पष्टपने सांगीतले यावेळही बैठकीचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ. गणेश मारेवाड यांनी केले.

यानंतर हॉटेल सिटी पॅलेस मधील बैठकीस येऊ न शकलेले आयोगाचे सदस्य मा. आ र. डी  शिंदे आणि मा. के आ र मेढे साहेब यांची हॉटेल  The fern येथे जाऊन स्वतंत्र भेट घेऊन सत्कार करून आपण आयोगाचे सदस्य म्हणून निवेदनाच्या प्रती देऊन प्रश्न सोडवावा अशी विनंती केली यावेळी जिल्ह्यातील साधारणपणे ६० समाज बांधव उपस्थित होते.

                    यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश सूर्यवंशी, अंबादास रेडेवाड गोविंद सोलेवाड गणेश मारेवाड,संपत तेली,गोपीनाथ घोरपडे यांच्यासह पूर्णा, पालम,गंगाखेड,परभणी समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या