💥गंगाखेड तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील सुतारकाम करणाराचा मुलगा बनला फौजदार ...!


💥सुनिल सुर्यवंशीचे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश💥

गंगाखेड/प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत गंगाखेड तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील सुतारकाम करणारे व्यंकटराव सुर्यवंशी यांचा मुलगा सुनिल याने घवघवीत यश संपादन केले असुन' एका भूमीहीन सुताराचा मुलगा फौजदार बनल्याने मित्र परिवार,गावकरी व नातेवाई यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


[ फोटो ; शनिवारवाडा येथे मित्रांकडून सत्कार व आनंद साजरा करताना सुनील सुर्यवंशी व मित्र परिवार]

सुनीलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गुजेगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय राणीसावरगाव, माध्यमिक शिक्षण संत जनाबाई विदयालय गंगाखेड,तर त्याने बीसीए ची पदवी राजर्षी शाहु महाविद्यालय लातुर, एमसीए चे पदव्युत्तर शिक्षण संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती येथुन घेतले.नांदेड येथे आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रामध्ये काही काळ अभ्यास केला त्यानंतर पुण्यात तयारी करून देखील राज्यसेवेच्या परिक्षेत अपयश येत असल्याने कुटुंबियांकडुन नाराजी जाणवत होती.त्यामुळे २०१८ मध्ये रेल्वेत नोकरी करून अभ्यास व सराव चालु ठेवला. अखेर जिद्दीने व मेहनतीने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे.   या यशाबद्दल त्यांचे रविवारी ( ता.13) रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे मित्रांकडून त्यांचा सत्कार करून आनंद साजरा केला. तर आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देत सत्कारासाठी आमंत्रित केले आहे.  

" भविष्यात राज्यसेवा गाठण्याची तयारी...


भारतीय रेल्वे नंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली असली तरी भविष्यात राज्यसेवेची तयारी सुरू असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

-- सुनिल सुर्यवंशी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या