💥डॉ.यशवंत खडसे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार...!


💥डॉ.खडसे यांनी गेली २८ वर्ष ज्ञानोपासक महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून व कार्यक्रमाधिकारी म्हणून काम पाहिले💥

जिंतुर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डिकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत खडसे यांना येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा तर्फे नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे. या बाबत नुकतेच त्यांना या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गोविंदराव कांबळे,कार्यवाहक डॉ. रविंद्र तिरपुडे व सरचिटणीस सुजीत मुरमाडे यांच्या स्वाक्षरीने पत्राद्वारे कळविन्यात आलेले आहे.

डॉ. यशवंत खडसे यांनी गेली २८ वर्ष ज्ञानोपासक महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून व कार्यक्रमाधिकारी म्हणून काम पाहिले. परभणी जिल्ह्यात असंख्य धम्म परिषदेत सहभाग नोदवित विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमात कार्यरत राहिलेले असुन एक आंबेडकरी विचारवंत म्हणून आज त्यांची ओळख आहे.

येत्या २७ मार्च २०२२ रोजी आठव्या वर्धापन दिनी जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळा तर्फे बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव हा पुरस्कार नागपुर येथील ऑडिटोरियम सभागृहात नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत डॉ. यशवंत खडसे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात दिलेल्या योगदाना बद्दल जो पुरस्कार जाहिर झाला. त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या