💥पुर्णा नगर परिषदेवर प्रशासकाच्या नियुक्ती नंतरही कोट्यावधी रुपयांच्या बोगस कामांचा सपाटा...!


💥मुख्याधिकारी नगर अभियंत्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? पुर्वीच्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांवर पुन्हा रस्त्याची काम💥

✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा ; नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व अन्य नगर सेवकांचा कार्यकाळ दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी रोजी संपल्या नंतर नगर परिषदेवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशानंतर प्रशासक म्हणून पाटील यांनी पदभार स्विकारला परंतु पुर्णा नगर परिषदेची बोगस विकासकामांची परंपरा मात्र प्रशासकांच्या नियुक्ती नंतरही थांबली नसल्याचे निदर्शनास येत असून 'शासनाचा विकास निधी मिळवा आवश्यकता नसलेल्या ठिकाणी विकासकाम दाखवून कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी जिरवा' असा एकंदर कारभार नगर परिषदेचे प्रशासक सुधीर पाटील यांच्या डोळ्यात धुळ झोकून चालवला जात असल्याचे निदर्शनास येत असून यास सर्वस्वी मुख्याधिकारी,नगर अभियंता व संबंधित कामाचे गुत्तेदार जवाबदार असल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत प्राप्त कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून शहरातील शिक्षक कॉलनी/इकबाल नगर परिसरातील अब्बास खान यांचे घर ते ढगे यांचे घरा पर्यंत तब्बल २४ लाख ९९ हजार ७०० रुपयांच्या निधीतून पुर्वी अल्पशः कालावधीपुर्वी झालेल्या सिमेंट रस्त्यावर अत्यंत निकृष्ट दर्जाचा सिमेंट रोड तसेच सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले तर प्रभाग क्र.१० मधील आंबेडकर नगर फुले नगर परिसरात तब्बल २० लाख १ हजार ३०० रुपयांच्या निधीतून सिमेंटरोड सिमेंट नालीचे दर्जाहीन निकृष्ट दर्जाचे बांधकाम तर प्रभाग क्रमांक १० मधील आंबेडकर नगर परिसरातील खंदारे यांचे घर ते राजभोज यांचे घर ते इंदिरा गांधी स्कुल पर्यंत तब्बल २९ लाख ९९ हजार ८०० रुपयांच्या भरघोस निधीतून निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात येतेय तर प्रभाग क्र.३ मधील शिक्षक कॉलनी/इकबाल नगर परिसरातील आप्पा हॉटेल ते कमळू यांचे घरापर्यंत पुर्वीच्याच अत्यंत दर्जेदार रस्त्यावर थातूरमातूर सिमेंट कॉन्क्रेट अंथरून तब्बल २४ लाख ९९ हजार २०० रुपयांच्या विकास निधीची विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास येत असून या सर्व बोगस कामांना मुख्याधिकारी,नगर अभियंता मंगेश देशमुख,सबओव्हर सिअर संजय दिपके जवाबदार असल्याचे निदर्शनास येत असून एकंदर ज्या परिसरात यापुर्वी अवघ्या काही कालावधीपुर्वी विकासकाम अर्थात सिमेंट रस्ते नाल्यांची काम झालेली आहेत त्याच ठिकाणी नव्याने काम दाखवून कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधी सोईस्कररित्या विल्हेवाट लावल्या जात आहे...

✍🏻विशेष वृत्त :- चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या