💥बोगस मजुर दाखविणाऱ्या मजूर सहकारी संस्थेची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा उपनिबंधक यांच्या कडे मागणी💥

 परभणी - जिल्हामध्ये विविध मजुर सहकारी संस्थेमार्फत अनेक कामाचे वितरण केले जाते परंतु काही मजूर सहकारी संस्थेवर मजुर नसलेल्या लोकांची मजुर म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुळात जे मजुर आहेत ते कामापासून वंचित राहत आहेत. जिल्हयामध्ये काही मजुर सहकारी संस्था हे चांगल्या प्रकारे काम करीत असून बहुतांशी मजुर सहकारी संस्था हया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मोठी आर्थिक उलाढाल करून हस्तांतरीत करण्यात आल्या असल्याने त्या मजुर सहकारी संस्थेवर शासकीय सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी, त्यांचे नातलग, आर्थिक दृष्ट्या सक्षम, मजूर नसलेले आपले हितचिंतकांचे नाव मजूर म्हणून नोंदविण्यात आलेली आहे व त्यांना मजूर दाखवून कागदोपत्री त्यांच्यानावाने कामाचे बिल उचलले जात आहे.


मुळात ही सर्व लोक मजूर आहेत की नाही हा चौकशीचा विषय आहे. गर्भ श्रीमंत लोक जर मजुर म्हणून दाखविले जात असतील तर ही एक गंभिर बाब आहे त्या मुळे ज्यांना मजुरी कामाची गरज नाही व ज्यांनी कधी आयुष्यात मजुरी केली नाही अश्या बोगस मजुरांना मजूर सभासद करून घेणाऱ्या मजूर सहकारी संस्थांची चौकशी करून दोषी मजूर सहकारी संस्थांवर कडक कार्यवाही करावी या मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सूरवसे यांची भेट घेऊन त्यांना दिले.

परभणी जिल्हयातील सर्व मजुर सहकारी संस्थांची चौकशी करुन त्यांच्या मार्फत संस्थेमध्ये सभासद असलेल्या मजुरांची आर्थिक स्थीती व ते खरेच मजुर आहेत का ? याची चौकशी करावी शिवाय ज्या मजुर सहकारी संस्थांनी अशा प्रकारचे बोगस मजुर दाखविले आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, त्याशिवाय मजुर सहकारी संस्थेकडे आलेला पैसा हा सरळ मजुराच्या खात्यावर बँकेमार्फत वर्ग करावा. त्या शिवाय जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थाच्या तात्काळ चौकशीचे आदेश देऊन धनदांडग्या व श्रीमंत असलेल्या मजुरांना मजुर सहकारी संस्थेवरुन कमी करून गोरगरीब मजुर जनतेच्या हाताला काम देऊन त्यांना मजुर म्हणून नोंदवून घेण्यात यावे या बाबत जिल्हा उपनिबंधक यांनी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयाविरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई, श्याम भोंग, शेख बशीर, धर्मेंद्र तूपसमिंद्रे इत्यादींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या