💥हिवरखेडा येथिल शेतकऱ्यांच्या विद्यूत मोटारीचा केबल चोरीला....!


💥अश्या घटना वारवार घडत आहेत भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहें💥

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी 

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील दि .16/03/2022 रोजी रात्रीच्या वेळीस चोरट्यांनी संधीचा फायदा घेत हिवरखेडा येथिल परमेश्वर वामनराव गायकवाड यांच्या शेतातील 300 फूट केबल चोरट्यांनी चोरून नेला आहें त्यामुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे 5 हजाराचे नुकसान झाले आहें अश्या घटना वारवार घडत आहेत भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहें.

या आधी देखिल बोरखेडी .पिनगाळे येथिल शेतकऱ्यांचा विद्यूत पंप चोरीला गेला होता आणि आत्ता हिवरखेडा येथिल शेतकऱ्यांचा विद्यूत मोटारीचा केबल चोरीला गेला आहें मागें काही दिवसापुर्वी साखरा येथिल अनेक शेतकऱ्यांचे स्टाटर चोरीला गेले होते या भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले त्यामुळे शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरणात निर्मान झाले आहें सेनगाव पोलिस स्टेशनच्या वतीने या भुरट्या चोरांना पकडून तात्काळ अटक करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थाकडून केली जात आहें...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या