💥वाह...रे लोकप्रतिनिधी अन् वाह..रे विकास ? समर्थन नाशवंत देहाचच.....पण सारं काही सून्न...छिन्नविछिन्न...विदीर्ण..!


💥परभणी जिल्ह्यातील तमाम रहदारीच्या रस्त्यांची दुरावस्था भयावह जीवघेणी व्यवस्था ठरत आहे💥

२०२२, तेरा मार्च, रविवारी सायंकाळचा, चारठाण्यानजीक अपघात एवढा भीषण होता, की घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा, रात्रीतून ठळक झाला आहे. सजीव दृश्ये धक्कादायक, काळिज पिळवटून टाकणारी आहेत. याच मार्गावर २४ जानेवारीला मालेगाव (ता.जिंतूर) येथील तिघा भावंडाचा अकोली पुलाजवळील, खड्डा चुकवितांना, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचे विस्मरण होण्याआधीच, सेलूतील तीन तरुणांवर काळाने घाला घातला.या घटनेमुळे सेलू,जिंतुरमधीलच नव्हे,तर परभणी जिल्ह्यातील तमाम रहदारीच्या रस्त्यांची  दुरवस्था, किती जीवघेणी व्यवस्था ठरत आहे. किती सुरक्षित आहे. याचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देते. ही व्यवस्था आणखी किती निष्पाप जीवांची भूकेलेली आहे ?

असा प्रश्न तसाच शिल्लक राहून, आणखी घटनांची वाट पाहत आहे. संवेदनाहीन 'जबाबदारां'ना या विषयावर विचारणे, आता पुळचटपणाचे लक्षण बनले आहे. बोलण्या, लिहिण्या, दाखविण्या आणि सांगण्यासाठीच्या 'ब्रेकिंग बातम्या' पुरत्या मर्यादित ठरू पाहणाऱ्या, अशा घटनां, व्यवस्थांबद्दल कोणी गंभीर होण्याची माणुसकी दाखविणे देखील चिंता, नव्हे चेष्टेचा विषय ठरत आहे. 'आवाज' उठविण्यापेक्षा, रस्त्यांचे विशेषतः त्यावरील खड्ड्यांच्या आरोग्याचे प्रश्नच उद्भवू नयेत, यासाठी एकवटण्याची गरज प्रकट करण्यापलीकडे, माझ्या सारख्या कित्येकांच्या हाती, काही शिल्लक तरी आहे का हो ? कोणाला फिकीर ? कोण बेफिकीर ? कोण होतोय निराधार अन् कोण प्रवृत्तीला जनाधार ? कोणाच्या वाट्याला यातना अन् कोण जागविल संवेदना ?








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या