💥पासपोर्टसाठी आता पोलीस स्टेशनला जाण्याची आवशक्यता नाही - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे💥जर कागदपत्र अपुरी असतील किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवले जाईल💥

विमान प्रवासासाठी किंवा इतर देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्याची वारी करावी लागते  मात्र आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत घोषणा केली आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले - आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलावले जाणार नाही.
यामध्ये केवळ जर तुमचे कागदपत्र अपुरी असतील , किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवले जाईल - असे त्यांनी सांगितले आणि हीच पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याची मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या