💥शिक्षणामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत - न्या.शैलजा सावंत


💥जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केले प्रतिपादन💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम: जागतिक महिला दिनाचे निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी यांची उपस्थिती होती. न्यायिक अधिकारी एस. एग, मेनजोगे, डॉ. रचना तेहरा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिदे,  जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्षा ऍड. सी. एन मवाळ यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अॅड. एन. टी. जुमडे, सह सचिव अॅड. कि. जे. सानप व इतर विधीज्ञ मंडळी तसेच इतर महिला, न्यायालयीन महिला कर्मचारी व इतर कर्मचारी देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाला वाशिम येथील इतर सर्व न्यायीक अधिकारी देखील हजर होते

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. संजय शिंदे यांनी केले. त्यांनी महिला दिनाची पार्श्वभुनी सांगितली. डॉ. रचना तेहरा यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगीक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश फुलबांधे यांनी महिलांचे घरगुती हिंसाचारापासुन संरक्षण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीमती तळेकर यांनी हुंडा प्रतिबंध या विषयावर तर श्रीमती पाचडे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम या विषयावर मार्गदर्शन केले.

             जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी महिला बदलतात परंतु त्यांच्या भुमिकेत बदल होत नाही असे सांगून  उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अणि महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रयत्नांनी आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे असे सांगितले.तसेच स्त्री पुरुष समानता ही बाब केवळ एका दिवसापुरती साजरी न करता ती प्रत्येक दिवशी आपल्या आचरणात आणावी असे देखील उपस्थितांना मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  हर्षा बारड यांनी तर आभार अॅड. गितांजली गवळी यांनी मानले....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या