💥नांदेड सचखंड गुरुद्वाराच्या संचालक मंडळाच्या चार सदस्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने केली रद्द....!


💥बेकायदेशीर नियुक्तींवर सरदार मनजीत सिंघ आणि दिवाणच्या इतर सदस्यांचा हा विजय💥 


नांदेड (दि.10 मार्च) - येथील सचखंड गुरुद्वाराच्या संचालक मंडळाच्या चार सदस्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली. सरकारने 20 जानेवारी 2022 रोजी अधिसूचनेद्वारे, सरदार गुरुचरणसिंघ घडीसाज,सरदार शेरसिंग फौजी,सुरेंद्रसिंग आणि सुरजितसिंग फौजी यांची हजूर साहेब खालसा दिवाणच्या सदस्यांच्या श्रेणीतून नियुक्ती केली.सरदार मनजीत सिंघ आणि इतर 16 सदस्यांनी 20 जानेवारी 2022 च्या सरकारी अधिसूचनेला आव्हान देणारी रिट याचिका ॲड.गणेश गाढे यांच्यामार्फत दाखल केली होती. माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.व्ही.दिघे यांनी आज 10 मार्च 2022 रोजी, सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजला नाही आणि चुकीचे नामांकन पाठवले या कारणास्तव, दिनांक 20 जानेवारी 2022 ची अधिसूचना रद्द केली. यापूर्वीही माननीय न्यायालयाने ४ जणांची नियुक्ती रद्द केली होती. बेकायदेशीर नियुक्तींवर सरदार मनजीत सिंघ आणि दिवाणच्या इतर सदस्यांचा हा विजय आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या