💥पोलिस प्रशासनाकडून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष कोम्बींग ऑपरेशन....!


💥जिल्हयातील पोलीस स्टेशन वाशिम शहर,कारंजा शहर याकार्यक्षेत्रात विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-जिल्हयात सध्या घरफोडी,चोरी, मोटार सायकल चोरी या सारख्या मालमत्तेच्या गुन्हयातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये जिल्हयातील पोलीस स्टेशन वाशिम शहर,कारंजा शहर याकार्यक्षेत्रात विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले.

दिनांक १२/०३/२०२२रोजी २३.०० ते दिनांक १३/०३/२०२२ चे ०५.०० दरम्यान विशेष कोम्बीग ऑपरेशन दरम्यान करण्यात आलेली कार्यवाही मध्ये एकुण १५ निगराणी बदमाश चेक केले,१४ माहितगार गुन्हेगार तपासले.०४ अजामीनपात्र वॉरंट मधील आरोपी अटक करण्यात आले.मुंबई दारुबंदी कायदयान्वये ०५ इसमांवर कारवाई करुन एकुण ४,८१०रुपायाचा/-माल जप्त करण्यातआला.तसेच रेकॉर्डवरील जातीय जेल मधुन सुटलेले इसम,पाहिजे आरोपी व अवैध शस्त्र बाळगणारे इसम चेक केले तसेच २ पारधी वस्त्या,कुंटणखाना,बस स्टॅड, हॉटेल धाबे,लॉजेस चेक करुन गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.

विशेष कोम्बींग ऑपरेशनचे दरम्यान पोलीस स्टेशन वाशिम शहर ,कारंजा शहर येथे ऊपविभागिय पोलीस अधिकारी वाशिम सुनील पुजारी,व उपविभागिय पोलीस अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ०७ अधिकारी ७२ अंमलदार यांनी विशेष कोम्बींग ऑपरेशन करुन मोहिम राबवीली तसेच माहे मार्च मध्ये दि.०१/०३/२०२२,ते दि.७/०३/२०२२ रोजी विशेष कोम्बीग आॅपरेशन राबविण्यात आले होते व वेगवेगळे अभिलेखावरील गुन्हेगार चेक करण्यात आले होते.सदर विशेष कोम्बींग ऑपरेशन चे आयोजन मा.बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात मा.गोरख भामरे अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांच्या नियंत्रणात उपविभागीय पोलीस

अधिकारी वाशिम,कारंजा तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी राबविले.वाशिम जिल्हयात वेळोवेळी विशेष कोम्बींगचे आयोजन करण्यावर भर दिला जाईल व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्याकरीता उपाययोजना करण्यात येतील असे मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या