💥जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमणार,राज्य सरकारचे आदेश....!


💥राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिन्यात संपत आहे💥


✍️मोहन चौकेकर

 राज्यभरातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिन्यात संपत आहे. तसेच या संस्थांच्या निवडणूका किमान 4 महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर 4 महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपताच जिल्हापरिषदेची सर्व सूत्रे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत. पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहेत. बीड जिल्हापरिषदेचे मुदत 20 मार्चला संपत आहे, तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत उद्या म्हणजे 13 मार्चला संपत आहे.


4 महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश :-

राज्यातील 27  जिल्हा परिषदांची व पंचायत समित्यांची मुदत मार्चअखेर संपणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या निवडणुका वेळेत होणार की, लांबणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मध्यंतरी राज्य सरकारने महापालिका वॉर्डांची हद्दवाढ केली होती. त्यात महापालिकांची वॉर्डसंख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका वेळेत होणार की, मुदतवाढ मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. आधी सरकार सर्व पक्षांचे मत जाणून घेऊन त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते.  मात्र आता या संस्थांच्या निवडणूका किमान 4 महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर 4 महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या