💥बिएच सिरिज नंबर प्लेट : गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल जाणून घ्या....!


💥केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत : संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं💥

✍️ मोहन चौकेकर

आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या बिएच सिरिजचा लाभ घेऊ शकतील.4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात.

किती अतिरिक्त शुल्क भरावं लागणार ?

या नवीन सीरिजमध्ये 10  लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.

बिएच नंबर प्लेट समजून घ्या :-

बिएच नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत, पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर 'BH' म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि 'A' म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी)

 बिएच नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा ?

बीएच नंबर प्लेट मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नवीन वाहन खरेदी करताना, ग्राहक डीलर वाहन पोर्टलद्वारे BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतो..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या