💥हिंगोली जिल्ह्यातील खैरी घुमट येथिल यात्रा महोत्सव ; हजारो भाविकांनी घेतले कानिफनाथाचे दर्शन....!


💥नेत्रदीप काठीचा रिंगण सोहळा रंगला💥

✍🏻शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली ; जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या खैरी घुमट येथे दि 13/03/2022 रोजी रविवारला यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी घेतले कानिफनाथाचे दर्शन गेल्या कोरोनामुळे गेल्या दोन वर्षा पासून हि यात्रा बंद करण्यात आली होती मात्र आत्ता कोरोना चे रुग्ण कमी झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हि पाहिलीच यात्रा भरली आहें.


नांदेड जिल्ह्यातील  डॊरली ता .हदगाव येथून या ठिकाणी कावडीचे आगमन होते त्या नंतर यात्रेला सुरुवात होते शेकडोवर्षा पासून हि परंपरा अखंडपणे सुरू आहें हि यात्रा पाच दिवस भरते पहिल्या दिवशी शिखरी काठ्याचे मिरवणूक पार पडली दुपारी 3 वाजता कानीफनाथ महाराजांच्या पालखीचे मिरवणूक निघते त्या पालखीच्या पाठीमागे वेगवेगळ्या गावातील मानाच्या काठ्या भगवे ध्वज भाविक मंदिराला वेढा मारतात आणि नंतर मंदिरात शिखरी काठ्या हातावर घेऊन नाचवतात हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने खैरी घुमट येथे येतात 

खैरी घुमट येथील मंदिर हें अत्यंत प्राचीन काली असून हें येथिल हें मंदिर किल्लासदृश वास्तू असून भव्य असल्याने भाविकांमधे मोठे आकर्षण आहें या किल्ल्यात हेमाडपंती पध्दतीचे कानिफनाथचे मंदिर आहें  येलदरी धरणाच्या जलाशयाच्या काठावर हें मंदिर असल्याने त्यांच्या वैभवात अधिकच भर पडली आहें यात्रेनिमित्त पंचक्रोशीत हजारो भावीक भक्त दर्शनासाठी येतात 

कळसाहूंन मुले फेकतात ;-

यात्रेनिमित्त येथे नवसाने झालेल मुलाबाळ कळसावरून फेकून खालील धोतराच्या पानत झेलले जाते मंदिर व्यवस्थापसह स्वयंसेवक मोठ्या जबाबदारीने हें काम पार पाडतात दरवर्षी नवस फेडण्यासाठी आलेले मंडळी हें अश्या पद्धतीने मुले फेकतात सेनगाव पोलिस स्टेशनच्या वतीने येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या