💥लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनो सावधान : एसीबी आता वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान....!


💥सरकारी कार्यालयात बसून ऐकले जाणार तक्रारदार आणि लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे बोलणे💥

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि भरपूर लाच मागुनही 'तो मी नव्हेच अश्या आवेशात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हुलकावणी देणाऱ्या लाचखोर सम्राटांना कालकोठडी दाखवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता 'ऑडिओ बग' नावाचे नवीन उपकरण आणले आहे हे उपकरण तक्रारदाराच्या खिशात राहणार आहे.

त्यामुळे तक्रारदार लाच मागणारा अधिकारी किंवा कर्मचारी काय बोलतात याचे संभाषण कार्यालयात बसलेले ए.सी.बी.चे अधिकारी थेट ऐकू शकणार आहेत एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सर्वसामान्य व्यक्तीला लाच मागतो तशी तक्रार ती व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( ए.सी.बी. ) देते, त्यानंतर ए.सी.बी. तक्रारदारासोबत एक पंच पाठवून सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितली किंवा नाही, याबाबत खात्री करतात मात्र, अनेकदा त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला संशय येतो त्यामुळे सापळा यशस्वी होत नाही. 

यावर ए.सी.बी.च्या पथकाने हा नवीन उपाय शोधला आहे.शासकीय कार्यालयात कामासाठी गेल्यानंतर अनेकदा काही अधिकारी कर्मचारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागतात. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर ए.सी.बी.चे पथक संबंधित लाचखोर अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पकडतात तक्रारदार ज्या वेळी तक्रार करण्यासाठी ए.सी.बी.कडे येतो त्या वेळी ए.सी.बी.चे पथक थेट सापळा रचून कारवाई करत नाही. 

कारवाईसाठी जाण्यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी याने तक्रारदाराला खरोखरच लाच मागितली की नाही हे पडताळून पाहते कारण विनापडताळणी सापळा केल्यास एखादेवेळी निरपराध कर्मचारी किंवा अधिकारी सापळ्यात अडकू शकतो त्यामुळे ए.सी.बी.कडून ही खात्री करण्यात येते ही पडताळणी करण्यासाठी ए.सी.बी.कडून तक्रारदारासोबत पंचाला पाठवण्यात येते. 

त्यानंतर त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने त्या पंचासमक्ष जर तक्रारदाराला रकमेसंदर्भात बोलणी केली तर लाच मागितल्याची खात्री होते त्यानंतर सापळा रचून त्याला पकडण्यात येते मात्र, यापुढे पंचासोबतच पडताळणी करण्यासाठी ए.सी.बी.जवळ ऑडिओ बग नावाचे उपकरण राहणार आहे हे उपकरण पंचाचे काम त्या ठिकाणी करणार आहे त्या उपकरणामुळे तक्रारदार लाचेची मागणी करणारा यांच्यातील संवाद ए.सी.बी.च्या अधिकाऱ्यांना ऐकता येणार आहे. यासोबतच सापळा झाल्यानंतर मे.न्यायालयात पुरावा म्हणूनसुद्धा ऑडिओ बगचा उपयोग होऊ शकतो.

अशा पद्धतीने होईल ऑडिओ बगचा वापर :-

ऑडिओ बगचा आकार मोबाइलपेक्षाही लहान आहे. त्यामध्ये एक सिमकार्ड टाकले असेल हे सिमकार्ड ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क आहे त्या ठिकाणी काम करेल ऑडिओ बगमध्ये सिमकार्ड टाकून ते तक्रारदाराच्या खिशात ठेवले जाईल तक्रारदार लाच मागणाऱ्यासोबत संवाद साधेल त्या वेळी कार्यालयात बसलेल्या ए.सी.बी.च्या अधिकाऱ्यांना तो संवाद ऐकता येईल. तक्रारदाराशिवाय इतर कोणालाही ऑडिओ बगची माहिती नसेल. 

या उपकरणाचा एका प्रकरणात नुकताच उपयोग करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या