💥बिड बसस्थानकातील उभ्या बसमध्ये प्रवाश्याने गळफास लावून केली आत्महत्या...!


💥मयत इसम शहरातील शाहूनगर येथील असून मयताचे नाव निवृत्ती भागुजी आबुज असे आहे💥 

बिड (दि.१५ मार्च) :- येथील बसस्थानका उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका प्रवाशाने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी घटना आज मंगळवार दि.१५ मार्च २०२२ रोजी घडली असून या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ माजली आहे सदरील प्रवाशाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नसून घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिस स्थानकातील पोलिस पथक घटनास्थळी येऊन सदरील पथकाने घटनास्थळ पंचनामा करून मृतदेहाला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बिड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.


आत्महत्या केलेला मयत इसमाची ओळख पटली असून संबंधित इसम  शरातील शाहूनगर भागातील राहणारा असून त्याचे नाव निवृत्ती भागुजी आबुज असे असून त्याचे वय ६० वर्षे आहे सदरील इसमाने बसस्थानकात उभ्या असलेल्या एस.टी. बस क्र.एम.एच.१४ बीटी-२२३७ मध्ये अँगलला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ माहिती बसस्थानकातील पोलिसांना कळविले. त्यानंतर सदरील इसमाचा मृतदेह पंचनामा करून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. सदरील घटनेची माहिती कळताच आबुज यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या