💥प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्णा तालुका कार्यकारणी जाहीर.....!


💥पुर्णा तालुका युवा आघाडी प्रमुख पदावर नरेश जोगदंड यांची तर शहर प्रमुख पदावर संजय वाघमारे यांची निवड💥


परभणी (दि.२२ मार्च) - प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्णा तालुका कार्यकारणी ची बैठक जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली व युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे व पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्या उपस्थितीत पूर्णा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीस ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या बैठकी मध्ये सर्वांनु मते प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहर प्रमुख पदी संजय वाघमारे व युवा आघाडी तालुका प्रमुख म्हणून नरेश जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.बैठकीस उपस्थित असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रमुख म्हणाले की,  प्रहार जनशक्ती पक्षाची ताकत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असून ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांचा कल प्रहार जनशक्ती पक्षाकडे वाढत आहे राज्य मंत्री मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या सामजिक कार्याचा ठसा आज ग्रामीण भागात उमटत आहे भावनिक व पैशाच्या जोरावर सुरू असलेल्या राजकारणाला जिल्ह्यातील जनता कंटाळली असून विकास व समाजहिताचे कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यप्रणालीला जनता स्वीकार करत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित जनता नक्कीच प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागे ताकतीने उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीत पूर्णा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकी बाबत ही सविस्तर चर्चा झाली.

बैठकीस जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, पुर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, पुर्णा युवा आघाडी तालुका प्रमुख नरेश जोगदंड, पुर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, मिडिया प्रभारी नकुल होगे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, सुशिल गायकवाड, आयुब शहा, सलीम शहा, गजानन सुरवाडीकर, मातीराम भोसले, नवनाथ चेपेले, नागेश जोगदंड, सुरेश वाघमारे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या