💥मालेवाडीच्या अभ्यासिकेला पुस्तके देणार सुनिल सुर्यवंशी यांची ग्वाही....!


💥मालेवाडीचे पहिले पोलीस अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचे ग्रामस्थांकडुन जंगी स्वागत💥  


गंगाखेड (दि.२० मार्च) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविण्यासाठी मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.मी तुमच्या सारखाच सामान्य मुलगा आहे. गावात अभ्यासिका नसल्यामुळे मी नांदेड,पुणे या सारख्या शहरात जाऊन अभ्यास व तयारी केली. अनेकदा परिक्षेत अपयश आले तरीही  मी निराशावादी झालो नाही.सातत्याने मेहनत घेतली व जिद्दीने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे.माझ्या यशामध्ये माझे कुटुंबिय,गावकरी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे माझ्या गावातील गरीब कुटुंबातील तरूणांना मदत करण्यासाठी मी नेहमी तयार असुन गावातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गरजु मुला-मुलींसाठी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी  अभ्यासिका तयार करावी या अभ्यासिकेला पुस्तके देण्याची जबाबदारी माझी राहील. अशा शब्दांत ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी( ता.19) रोजी सत्काराला उत्तर देताना सुनिल सुर्यवंशी यांनी ग्वाही दिली आपल्या गावाची ओळख ही अधिकारयांचे गाव म्हणुन व्हावी अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केली  ग्रामस्थांच्या वतीने सुनिल सुर्यवंशी यांचेसह त्यांचे आई ,वडील व कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव मुरकुटे,प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शिवाजीराव मुठाळ, संजय रायबोले,उपसरपंच उमेशसिंग चंदेल ,शिद्धोधन भालेराव( माजी सरपंच ईसाद)भानूदास शिंदे,माजी उपसरपंच अर्जुनसिंग चंदेल,,पिराजी शिंपले,विशाल माने (आर्मी),दशरथ तायडे हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ साळवे यांनी केले तर आभार माजी सरपंच श्रीकांत गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच श्रीकांत गायकवाड,आकाश गायकवाड,अशोक गायकवाड,निवर्ती गायकवाड,संघरत्न गायकवाड,किशन भालेराव,सिध्दार्थ गायकवाड,अनिल माने,रमेश सुर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांकडुन करण्यात आले होते.यावेळी  मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष  उपस्थित होते. 

 मालेवाडी येथे फौजदार पदी निवड झाल्याबद्दल सुनिल सुर्यवंशी यांचा सत्कार करताना गांवकरी दिसत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या