💥नांदेड-मुदखेड महामार्गासाठी २०६.५४ कोटी मंजूर....!


💥ना.नितीन गडकरी यांचा निर्णय ; पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश💥

नांदेड (दि.१९ मार्च) : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वरील नांदेड ते मुदखेड रस्त्याची दर्जोन्नती व भूसुधारणेच्या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून, त्यासाठी २०६.५४ कोटी रूपयांचा निधी देण्याचेही जाहीर केले आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी या मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. उभय मंत्र्यांमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकींमध्ये हे विकास काम मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीला व पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी या कामाला मंजुरी दिली आहे. हे सुमारे १६ किलोमीटर लांबीचे काम असून, यामध्ये गोदावरी नदीवरील एका पुलाचाही समावेश आहे. ना. नितीन गडकरी यांनी या निर्णयाची ट्वीट करून माहिती दिली असून, त्यानंतर ना. अशोक चव्हाण यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या