💥मानवतेला काळीमा फासणारी घटना ; एक वर्षाच्या चिमुकलीला जन्मदात्या बापानेच जिवंत पुरले....!


💥रिसोड तालुक्यातील वाडीवाकदची हृदयविदारक घटना💥


✍🏻फुलचंद भगत

वाशिम (दि.१२ मार्च) :-जिल्ह्यात धक्कादायक प्रकार ऊडघडकीस आला असुन सदर घटना मन सुन्न करणारी आहे.एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना दिनांक ११ मार्चच्या संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. सुरेश घुगे वय सत्तावीस वर्ष असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.                 वाशिम जिल्ह्यात धक्कादायक आणी मन सुन्न करणारी घटना घडली आहे.निर्दयी बापानेच चिमुकल्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत खड्ड्यात गाडल्याची घटना ऊघडकीस आली असुन यामध्ये मुलीचा मृत्यु झाला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. दोघा पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा.यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची.सुरेशला दारूचे व्यसन असल्याने, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे जाऊन सासरकडील दिराला हकिकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली असता ही हकीकत त्याने स्वतः सांगितली. आणि प्रेत उकरून काढून याबाबतची सूचना रिसोड पोलिसांना दिली.रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून, आरोपी निर्दयी पिता सुरेश यास अटक केली असून,पुढील तपास सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या