💥वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय मुस्लीम समन्वय समिती बैठक संपन्न....!


💥यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणारे मुस्लीम समाजातील पुरूष व महिलांना निमंत्रीत करण्यात आले होते💥


फुलचंद भगत

वाशिम:- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली दि.१९ मार्च २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे मुस्लीम समाजाचे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधणे, कायदा व सुव्यवस्था प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करणे, समाजात घडणा-या अनिष्ट घटनेबाबत प्रशासनाला अवगत करणे, मुस्लीम समाजाच्या प्रशासनाप्रती समन्वयाचा अभाव दुर करणे या उददेशाने जिल्हास्तरीय मुस्लीम समन्वय समिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन या करीता संपुर्ण वाशिम जिल्हयातील विविध क्षेत्रात कार्य करणारे मुस्लीम समाजातील पुरूष व महिलांना निमंत्रीत करण्यात असुन याकरीता २७ सदस्य हजर होते.

                 मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी मुस्लीम समन्वय समितीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.या दरम्यान सर्व प्रथम त्यांनी वाशिम पोलीस दलाची सन २०२१ ची उल्लेखनिय कामगिरी बाबत माहिती पिपीटी द्वारे सादर केली.तसेच वाशिम पोलीस दलाचे वतिने नागरीकांच्या सोयी साठी राबविण्यात येणा-या नवनविन उपक्रमाबाबत माहिती दिली त्यामध्ये विशेषतः डायल ११२,निर्भया पथक, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली सेवा प्रणाली, दृष्टी, किस्प इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या सोबत वाशिम पोलीस दल हे महिलांच्या सुरक्षीतते करीता सदैव तत्पर असुन संवेदनशिल असल्याबाबत माहिती दिली.

यानंतर समितीच्या बैठकी दरम्यान उपस्थितांपैकी ७ सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून मा पोलीस अधीक्षक यांचे आभार व्यक्त केले तसेच मुस्लीम समाजाच्या महिला व पुरूष यांचेकरीता प्रथम असा समन्वय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन यामध्ये मुस्लीम समाज हा नेहमी प्रशासनासोबत असेल असे आश्वासन देवुन समाजातील अडीअडचणी बैठकी दरम्यान मांडल्या. तसेच काही सदस्यांनी समाजोपयागी सुचना दिल्या. त्यावेळी मा.पोलीस अधीक्षक यांनी समस्या व अडीअडचणी जाणुन घेवुन त्यावर मार्गदर्शन केले तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखणे करीता पोलीसांसोबत समन्वय ठेवणे बाबत आवाहन केले. तसेच पोलीसांकडुन नेहमी तत्पर-कायदेशिर-निष्पक्ष कार्यवाही बाबत ग्वाही दिली.

सदर कार्यक्रमामध्ये सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रास्तावीक सपोउपनि मोहम्मद इद्रीस यांनी केले असुन या कार्यक्रमा करीता मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS), सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी(IPS) व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या