😅अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच.....!


...अन् शेवटी पुढाऱ्याच्या भावाला बायकोला-पोराला-पोरीलाही निवडून द्यायच...अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच😜

कविता :- चौधरी दिनेश (रणजीत)

अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच...तिनपाट पुढारी म्हणन ते काम माकडावाणी टणाटणा उड्या मारत करायच...त्याने दिल ते खायच अन् गुमान शेपूट हलवत पक्षात पक्षनिष्ठ म्हणून राहायच...!

धर्माच्या नावावर त्याच्यासाठी रात्रंदिवस दारोदार फिरून मतदान मागायला जायच अन् जिवापाड कष्ट करून त्या जातीयवाद्याला बहुमतान निवडून द्यायच...बहुमतान निवडून द्यायच!!

अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच...निस्वार्थपणे पक्ष वाढीसाठी भरपूर काम करायच पण स्वतःसाठी पक्षाच तिकीट मागीतल तर 'स्वतःची जात अन् औकात पाहून तिकीट मागायच' हे पुढाऱ्याने उच्चारलेल वाक्य वेड्या अस मनाला लावून नाही घ्यायच...!

निवडणूक जवळ आली की पुढाऱ्याच्या इशाऱ्यावर जातीय दंगलीला प्रोत्साहन द्यायच ? जाळपोळ दगडफेक करीत दंगल घडवून स्वतः जेल मधी जायच अन् संधीसाधू जातीयवादी पुढाऱ्याला निवडून द्यायच....!!

माय-बापाच्या कष्टाच खायच गलिच्छ राजकारणाच्या नादी लागून माय-बापाच मन दुःखवायच अरे शेवटी बाप-दादाची शेत जमीन विकून पुढाऱ्याच्या माग फुशारक्या मारत फिरायच अन् पुढाऱ्याला मात्र हरामची कमाई करून द्यायच...! 

जिवनभर मरोस्तर कष्ट करून झेंडे लावायच सतरंज्या उचलत राहायच अन्  शेवटी पुढाऱ्याच्या भावाला-बायकोला-पोराला-पोरीलाही निवडून द्यायच...अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच...अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच....अरे वेड्या तु अस मनावर नाही घ्यायच...!!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या