💥आग्या मोहोळाच्या हल्ल्यात १३ जण जखमी ; ३ जण गंभीर...!


💥रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाची तत्परता💥


फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील पोघात येथे आगे मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात १३ मजुर जखमी झाले. यातील ३ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये ५ महिला व ८ पुरूषांचा समावेश आहे. हे सर्व हमीद पाटील यांच्या शेतात हरभरा सोंगणीचे काम करित असतांना शेतमालक जे जेवण करण्यासाठी बांधावरील झाडाखाली बसले तेव्हा अचानक झाडावर असलेल्या आगे मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला यासोबतच हरभरा सोंगणीचे काम करणाऱ्या मजुरांवर देखील हल्ला केला. 


यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती १०८ रुग्णवाहिकेचे वाहक चंद्रकांत मुखमाले यांनी तत्काळ साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य यांना दिले. माहिती मिळताच तत्काळ पथकाचे सदस्य अनिकेत इंगळे व बुध्दभुषण सुर्वे आदि सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना धीर दिला. व लगेच १०८ रुग्णवाहिका वाहक चंद्रकांत मुखमाले व डाॅ. मिलन चव्हाण देखील घटनास्थळी दाखल झाले. व सर्व जखमींना घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. यामुळे आगे मधमाशा ह्या आक्रमक होत आहेत. तरी शेतात काम करत असताना मजुर शेतकर्यांनी योग्य की खबरदारी घ्यावी. असे आवाहन रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाकडुन करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या