💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाचे अपडेट....!


💥चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक ; 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचून या शहरात लॉकडाऊन💥 

✍️ मोहन चौकेकर

1. 'विकासाची पंचसूत्री' मांडल्याचा दावा करत सव्वाचार लाख कोटींचा अर्थसंकल्प

2. शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा , कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदी योग्य दिशेनं, अंमलबजावणी झाल्यास शेतकर्‍यांना लाभ, शेतकरी नेते अनिल घनवट यांच्याकडून अर्थसंकल्पाचं स्वागत 

3. मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत तीन लाख तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार;  उपमुख्यमंत्री / अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा 

4. आज सादर झालेला अर्थसंकल्प विकासाची दिशा दाखवणारा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अजित पवारांचं कौतुक , बजेटमधून जनतेची घोर निराशा, आम्ही केलेल्याच घोषणा पुन्हा केल्या' विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका 

5. असली लड़ाई तो मुंबई में होगी.. असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई महापालिका निवडणुकीचा एल्गार , भाजपचे मिशन मुंबई! मराठी मतांसोबत उत्तर भारतीय मतांची अपेक्षा 

6. बिलो टेंडरचा आग्रह जनतेच्या पैशाची उधळपट्टी, पोलीस स्टेशन्समधील खराब CCTV वरुन मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी 

7. मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकाम बंद, पोलीस आयुक्तांचे आदेश 

8. मुंबईत एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा महत्त्वाचा निर्णय, बीट अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा चौकीच्या परिसरातील एकट्या वृद्धाची भेट घेण्याचा आदेश 

9.  देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 रुग्ण, 255 जणांचा मृत्यू , राज्यात गुरुवारी 452 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 494 जण कोरोनामुक्त 

10. चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक! 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचून या शहरात लॉकडाऊन 

 महाराष्ट्र अर्थसंकल्प स्पेशल :-

11.One Crore For 10 Schools: महापुरुषांच्या गावांतील 10 शाळांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी, त्या दहा शाळा कोणत्या ? 

12.Maharashtra Budget Session 2022 : नव्या बुलेट ट्रेन मार्गाचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाचा विस्तार; राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा 

13.Healthcare Sector Maharashtra Budget 2022 : जिल्ह्याच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय, पुण्यात इंद्रायणी मेडिसिटी उभारणार : अजित पवार  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या