💥पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीती असोल्यात वृध्द दाम्पत्याचा निर्घृण खून....!


💥घटनेत अन्य एक महिला गंभीर जख्मी💥

परभणी/पुर्णा (दि.१६ मार्च) - पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील असोल्यात आज बुधवार दि.१६ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका वृद्ध दाम्पत्याचा अज्ञात व्यक्तींनी निर्घुन खून केल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत अन्य एक देखील महिला गंभीर जखमी झाली आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की असोला येथील शंकरराव ग्‍यानोजी रिक्षे वय ७० वर्षे त्यांची पत्नी सौ.सारजाबाई शंकरराव रिक्षे हे दोघे काल मंगळवार दि.१५ मार्च २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास नियमीतपणे रात्रीचे जेवण करून झोपले होते त्यांच्या समवेत त्यांची मेहुणी गिरजाबाई गोविंद आडकिने याही मुक्कामी होत्या आडकिने यांच्यासोबत एक अज्ञात तरुण मुक्कामी होता. सकाळी शेजारील मंडळींनी शंकरराव रिक्षे यांच्या घराचे दार लोटून का उठले नाहीत म्हणून पाहिले असता, शंकरराव व सारजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला दिसून आल्या, ग्रामस्थांनी तातडीने ताडकळस पोलिसांना माहिती कळवली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी धावून आले. गिरजाबाई आडकिने यांना प्रत्यक्षदर्शींनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले , तिथून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकास पाचारण केले तसेच ठसे तपासणीचे काम सुरू केले आहे. या प्रकाराने या गावात मोठी खळबळ उडाली आहे दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी कोणताही खुलासा केला नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या