💥जिंतूर तालुक्यातील चारठाण्याजवळ बस व मोटारसायकलची धडक ; भिषण अपघातात तिघा मोटारसायकलस्वारांचा दुर्दैवी मृत्यू...!


💥दोन वाहनात समोरासमोर जबरदस्त धडक झाल्याने तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू💥 

जिंतूर (दि.१३ मार्च) :- तालुक्यातील चारठाणा गावापासून जवळच असलेल्या शिंगटाळा पाटी जवळच बस व मोटार सायकलची धडक झाल्याने तिघा मोटारसायकलस्वारांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दि.१३ मार्च रोजी सायं. ७:३० वाजेच्या सुमारास घडली.

मोटारसायकल क्रमांक एम.एच.२१ ऐजे ६२५६ या दुचाकीवरून सेलु येथील रहिवाशी असलेले पाच जण मोटारसायकलवर बसुन येलदरी येथुन सेलु कडे जात असतांना जिंतूर आगाराची औरंगाबाद येथून जिंतूरकडे जाणारी बस क्रमांक एमएच १३ सि यु ६९२१ या दोन वाहनात समोरासमोर जबरदस्त धडक झाल्याने तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली,या  घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सपोनि बालाजी गायकवाड,सिद्धार्थ आचार्य, आदींनी धाव घेतली. चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक शे.ईसाक यांच्या मदतीने जिंतूर शासकीय रुग्णालयात  हलविण्यात आले असुन आधिक तपास चारठाणा पोलीस करत असून बातमी लिहीपर्यंत मृत्यांची नावे समजु शकली नाहीत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या