💥राष्ट्रीय लोक अदालतीत वाशिम पोलीस घटकातील 742 प्रकरण निघाले निकाली....!


💥जाब देणार व आरोपी यांना 2,22, 650 रुपयें आकरला दंड💥

फुलचंद भगत

वाशिम:-संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय लोक अदलातीचे १२ मार्च २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली असुन संबधीत पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये सहभागी होवुन आपले वाद समोपचाराने मिटविण्यासाठी, आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे,मोटार वाहन चालान प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहीक वाद, भु संपादन प्रकरणे, मनाई हुकमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पुर्तता विषयक वाद इत्यादी प्रकरणे सुनावणी साठी ठेवण्यात आली होती. सदर राष्ट्रीय लोक अदालत वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती यांचे वतिने राबविण्यात आली आहे.

               वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी या राष्ट्रीय लोक अदालतीच्या संबंधाने तडजोडीस पात्र गुन्हयाचे जास्तीत जास्त समन्स मा न्यायालयातुन प्राप्त करुन आरोपीतांना समन्स तामील करुन मा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत करीता हजर ठेवले यामध्ये दिनांक १२ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पुढील प्रमाणे घटक निहाय केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९ प्रमाणे एकुण १०९ केसेस व ४०, ३०० रुपये दंड, कलम २८३ भादंविच्या १८ केसेस व ४,००० रु दंड, कलम १२ अ जुगार अधिनियम प्रमाणे ४६ केसेस व १६,३०० रु दंड, कलम १८४, १८५ मोटार वाहन कायदा चे ०४ केसेस व १५०० रु दंड, कलम ११०/११७, ३३ RW/१३१ महाराष्ट्र पोलीस अधिनियम च्या ०७ केसेस व १४०० रु दंड, कलम ६६/१९२ मोटार वाहन कायदयान्वये ३२५ केसेस व ७२,४०० रु दंड तसेच मोटार वाहन कायदयातंर्गत ई चालान द्वारे करण्यात आलेल्या एकुण २३३ केसेस मध्ये ८६,७५० रु दंड आकारण्यात आला आहे. असे विविध ७४२ प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन एकुण २,२२,६५० रुपयांचा दंड यातील जाब देणार व आरोपीतांना आकारण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे दिनांक ०१.०८.२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकुण ७४७ प्रकरणे व दिनांक २५.०९.२०२१ रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकुण ७५४ प्रकरणे तसेच दिनांक ११.१२.२०२१ रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकुण १०५८ प्रकरणे व दिनांक १२.०३-२०२२ रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ७४२ प्रकरणे अशा मागील चार राष्ट्रीय लोक अदालत मध्ये फौजदारी तडजोडीस पात्र अशा एकुण ३३०१ केसेस/प्रकरणे मा न्यायालयाचे वतीने निकाली काढण्यात आलेल्या आहेत.असे वरीलप्रमाणे सर्व फौजदारी व तडजोडीस पात्र प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातुन निकाली काढण्या करीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.स्टे.प्रभारी अधिकारी, टि.एम.सी.सेल वाशिम व सर्व पो.स्टे.कडून नेमण्यात आलेले कोर्ट पैरवी यांना वेळोवेळी मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे (IPS) यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या