💥नॅनो यूरीयाचा वापर करून पारंपारिक यूरीयाची खत मात्रा 50 टक्क्यानी कमी करावी - डॉ.गडदे


💥जिल्हयातील जांब येथे पार पाडलेल्या पिक परिसंवाद कार्यक्रमात बोलतांना त्यांनी प्रतिपादन केले💥

परभणी (दि.16 मार्च) : शेतकरी विविध पिकामध्ये यूरीया खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, ज्यामुळे कालांतराने जमिनीची पोत खराब होते. याला पर्याय म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असलेला नॅनो यूरीया हा अतिशय उपयुक्त असा खत असून याचे वापरण्याचे प्रमाण पारंपारिक युरीयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नॅनो यूरीयाची 500 मिली  ची एक बॉटल एक बॅग यूरीयाचे काम करते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे यांनी नुकत्याच परभणी जिल्हयातील जांब येथे पार पाडलेल्या पिक परिसंवाद कार्यक्रमात सांगितले. 


या प्रसंगी डॉ.गडदे यांनी असेही सांगितले की नॅनो यूरीयाचा 2 ते 4 मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिक 30 ते 35 दिवसाचे असताना पहीली फवारणी व 50 ते 55 दिवसाचे असतानी दुसरी फवारणी करावी. तसेच पारंपारिक यूरीया खताचा पहिला डोस लागवडीच्या वेळेस देणे गरजेचे आहे आणि लागवडीनंतर लागणा-या यूरीयाचा पुरवठा नॅनो यूरीयाच्या फवारणी व्दारे  करावे. याचाच अर्थ असा आहे की 50 टक्के पारंपारिक यूरीयाची मात्रा कमी करता येते. 

या कार्यक्र माला जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळासाहेब रेंगे अध्यक्ष म्हणून उपस्थीत होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, कृषि विज्ञान केंद्र, परभणी चे प्रा.अमित तुपे, जांब गावचे सरपंच श्री.रामभाऊ रेंगे,  उपसरपंच श्री. बंडू लाड, प्रगतशील शेतकरी श्री.संग्राम भैया, गावचे प्रतिष्ठीत नागरीक श्री.कल्याणरावजी रेंगे, इफको कंपनीचे श्री.अजय वाढे, आयपीएल कंपनीचे श्री.खर्चे यांची प्रमुख उपस्थीती लाभली होती. या प्रसंगी शेतक-यांशी संवाद साधत  असताना शेती विषयक विविध पिकाबाबत जसे की उन्हाळी सोयाबीन, ऊस, मोसंबी आदि पिकांच्या बाबतीत खत व पाणी व्यवस्थापन बाबत डॉ.गडदे व डॉ.तुपे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्र मासाठी 100 ते 125 शेतकरी उपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या