💥धुलीवंदना निमित्त आज 18 मार्चला सर्व किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद राहणार....!


💥आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येणार💥

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यात 18 मार्च रोजी धूलिवंदन हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. धुलीवंदनाच्या या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री परवाना असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.या आदेशाचे अनुज्ञप्तीधारकांनी तंतोतंत पालन करावे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल.असे या आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या