💥हिंगोली जिल्ह्यात आज गुरूवार दि.17 मार्च पासुन 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरण....!


💥अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांनी दिली💥

हिंगोली (दि.17 मार्च) - जिल्ह्यात आज गुरुवार दि.17 मार्च पासून वय वर्षे 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरणास गुरूवार सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांनी दिली आहे. 

कोव्हीड-19  लसीकरणाला गुरुवार पासून सुरूवात होणार असून जिल्ह्यातील 12 ते14 वयोगटातील बालकांचे लसीकरण नियोजन करण्यात आले आहे. कोव्हीड लसीकरण ज्या बालकांचे वय12, वर्षे पूर्ण झाले आहे. केवळ आशा बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी लस देण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटातील बालकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा लसीकरण केंद्रावर आपले ओळखपत्र घेऊन लसीकरण करून  घ्यावे असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या