💥अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ : अमरावती येथे 13 मार्च रोजी एक दिवसीय खूले अधिवेशन संपन्न...!


💥उद्योजक संतोषभाऊ शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सत्कार💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

महाराष्ट्रात उद्योजक म्हणून ओळख असलेले संतोषभाऊ शिंदे पानकनेरगांवचे शेतकरी सूपूत्र एक यशस्वी उद्योजक सालगडी ते उद्योजक असा  थक्क करणारा प्रवास रविवार 13 मार्च रोजी अमरावती येथे पत्रकाराचे खूले एकदिवसीय अधिवेशन निमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शेतकरी उद्योजक संतोष शिंदे यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला व यावेळी उपस्थित अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सूने, युसूफ खान केंद्रीय कार्याध्यक्ष,सुरेश सावळे केंद्रीय महासचिव, अशोक पवार केंद्रीय सचिव,  राजेंद्र भुरे केंद्रीय उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर बोराळकर केंद्रीय उपाध्यक्ष, अशोक यावूल केंद्रीय कोषाध्यक्ष, मनोहर चरपे केंद्रीय सदस्य, माणिक ठाकरे केंद्रीय सदस्य, कैलास देशमुख केंद्रीय सदस्य, सौ जयश्री फटडागडे महिला मंच प्रदेशाध्यक्ष,गोपालराव सरनायक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, विकास दळवी हिंगोली जिल्हा अध्यक्ष, व तसेच पदाधिकारी आणि महाराष्ट्र काणा कोपर्यातून आलेले पत्रकार बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या