💥ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे उद्या 10 मार्च पासुन प्रशिक्षण....!


💥पाटोदा ग्राम पंचायतचे माजी सरपंच भास्कर पेरे करणार मार्गदर्शन💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 10 ते 12 मार्च 2022 दरम्यान नियोजन भावन येथे करण्यात आले आहे. गावातील शाश्वत स्वच्छतेबाबत या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. कार्यशाळेत पाटोदा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे उद्घाटन जि प चे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे करणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन जि प चे उपाध्यक्ष श्याम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, सुरेश मापारी,  शौभाताई गावंडे, वनिताताई गावंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यशाळा कोणासाठी:-

ग्राम स्वच्छता निगरानी समितीमध्ये गावातील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, ग्राम पंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांचा समावेश केला आहे. काही गावांमध्ये याशिवाय काही सदस्य असु शकतात. या सर्व सदस्यांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

कशाचे प्रशिक्षण देणार :-

ग्राम स्वच्छता निगरानी समिती सदस्यांना गावातील स्वच्छता शाश्वत रहावी म्हणुन शौचालयाचा वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गुड मॉर्निंग पथक, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ई बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आदर्श ग्राम पंचायतचे माजी सरपंच भास्कर पेरे आणि वाशिम येथील जि प शाळेचे मुख्याध्यापक तथा स्वच्छतादुत राजु सरतापे हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे वेळापत्रक :-

दिनांक        वेळ       तालुका     वेळ    तालुका       

10 मार्च     स.10      मंगरुळपीर  दु. 2    वाशिम

10 मार्च     स.10      मानोरा        दु. 2    रिसोड

10 मार्च     स.10      कारंजा        दु. 2    मालेगाव

या कार्यशाळेला विस्तार अधिकारी पंचायत, बीआरसी- सीआरसी व निगरानी समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या