💥औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रोख रक्कम सह विसरलेली बॅग शोधण्यात अखेर यश....!


💥सन २०११ पासून आजपर्यंत ३०० पेक्षा अधिक बॅग व दागिने पर्स सह इतर सामायन मूळ प्रवासी यांना परत करण्यात💥

💥प्रवासी रेल्वे सेनेचे संतोषकुमार सोमानी यांनी प्रवासी वर्गाच्या मदतीसाठी सातत्याने निभावली महत्वाची भुमिका💥

औरंगाबाद (दि.२६ फेब्रुवारी) - लासूर स्टेशन च्या गणपती मंदिर चे पुजारी हे बाहेर गावी जाऊन लासूर स्टेशनला घरी जाण्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशन ला होते आदीलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या एस-८ डब्यात चढले सोबत आणलेल्या इतर बॅग घेऊन ते रेल्वे डब्यात चढले परंतु एक बॅग मात्र घेण्याचे विसरले 

नंदीग्राम एक्सप्रेस दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ आल्यावर त्यांना एक बॅग विसरून गेल्याचे लक्षात आले ही माहिती व बॅग चे वर्णन त्यांनी तात्काळ रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी व करंजगाव स्टेशन मास्टर कमल श्रीवास्तव यांना दिली ही माहिती औरंगाबाद आरपीएफचे निरीक्षक परमवीर सिंग यांच्या सह आरपीएफ कर्मचारी यांना कळविले यावरून तात्काळ आरपीएफ जवान यांनी बॅग शोधली तिची तपासणी केली असता त्यात इतर सामान व रोख रक्कम मिळून आली ही बॅग आज शनिवार दि.२६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद कडून मूळ प्रवासी यांना देण्यात येणार आहे

याकामी आरपीएफचे निरीक्षक परवीर सिंग,रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी,करंजगाव स्टेशन मास्तर कमल श्रीवास्तव आरपीएफ जवान यांनी सेवाकार्य केले आहे २०११ पासून आजपर्यंत ३०० पेक्षा अधिक बॅग व दागिने पर्स सह इतर सामायन मूळ प्रवासी यांना परत करण्यात यश मिळाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या