💥परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी....!


💥जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी स्वखर्चातून शिव जन्मोत्सवाचे औचित्य साधून मुक बधीर दाम्पत्यास दिले उदरनिर्वाहाचे साधन💥

परभणी - रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज एक अनोख्या व आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली. परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द येथील दिव्यांग असलेले व १००% मुक बधीर दाम्पत्य श्री. सुमेध इंगोले व सौ. प्रियंका इंगोले या दांपत्यास उदर निर्वाह चे साधनं म्हणून शिलाई मशीन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी त्यांच्या स्वखर्चातून आज शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून भेट म्हणून दिली सामान्य कुटुंबातील व गावातील दुसऱ्यांच्या शेतात मिळेल ती मजुरी करून  स्वतः चा व कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या भूमिहीन असलेल्या या गरजवंत दांपत्यास या शिलाई मशीन मुळे स्वाभिमानाने स्वतः चा व्ययसाय सुरू करून पायावर उभे राहता येईल.

आज श्री व सौ इंगोले यांच्या घरी जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांना शिलाई मशीन भेट म्हणून देण्यात आली या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, सावंगी खुर्द चे सरपंच सुनील पंढरकर, माजी सरपंच गुलाब पंढरकर, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मिडिया प्रभारी नकुल होगे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, दत्तराव रोंदळे, दिलीप दिपके, कैलाश पुंजारे इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या