💥हभप.तुळशीदास महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर...!


💥आज शनिवारी कापसी परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती💥

गंगाखेड प्रतिनिधी 

परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवईमाय संस्थानचे मठाधिपती तुळशीदास महाराज देवकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी कापसी परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.


कापसे शिवारात पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने शिवजयंती व ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसीय कार्यक्रमात मान्यवर महाराजांची कीर्तने संपन्न झाली .शनिवारी शेवटच्या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा पार पडला. परभणी जिल्ह्यातील दूरवरून आलेल्या भाविकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत महाराजांचे आशीर्वाद घेतले. शिवचरित्रकार नलावडे महाराजांचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर  माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे ,ह भ प भागवत महाराज आवलगावकर ,ह भ प रोहिदास महाराज मस्के, तुषार गोळेगावकर रत्नाकर शिंदे ,मुंजाभाऊ लांडे आदी सह परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाच दिवसाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह भ प अनंत महाराज बर्वे, ह भ प गणेश महाराज कापशीकर, प्रकाश महाराज शिरपूर , प्रकाश मुळगिर , साहेब जाधव, विठ्ठल धा,मुंजा मुळगीर, बाबासाहेब होरे, धोंडीराम नरगरे सर आदींनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या