💥मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमानीचा २० वर्षीय युवक आठ दिवसापासून बेपत्ताच....!


💥मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये हरवल्याची तक्रार दाखल💥 

फुलचंद भगत

वाशिम - मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम अमानी येथील ३० वर्षीय युवक कुंडलीक उत्तम देशमुख हा १२ फेब्रुवारीपासून घरुन निघुन गेला असून आठ दिवस होवून या युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्यामुळे नातेवाईक हताश झाले आहेत.

सदर युवक बाहेर चहा प्यायला जातो असे म्हणून गेला होता. याबाबत नातेवाईकांनी मालेगाव पो.स्टे.मध्ये हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मालेगाव पोलीस युवकाचा शोध घेत असून जिल्ह्यात कोणालाही हा युवक आढळून आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या