💥श्री.छत्रपती संभाजी महाराज विद्यालयात आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धेत कु.जान्हवी विरेश स्वामी तृतीय...!


💥जान्हवीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव💥


 
✍🏻- लक्ष्मीकांत स्वामी (जवळेकर) ताडकळस

पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - तालुक्यातील सुहागण येथील श्री.छत्रपती संभाजी महाराज विद्यालयात विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या परभणी येथील भारतीय बाल विद्या मंदिर प्रभावती नगर शाखेची विद्यार्थिनी कु.जान्हवी विरेश स्वामी हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 

बक्षिसाचेे स्वरुप १७०१/- रुपये रोख व स्मृतिचिन्ह या मिळालेल्या यशाचे श्रेय तिने सह शिक्षक श्री.कळंके सर यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या