💥टाकाऊ वस्तू पासून सहज ऊपलब्ध साहित्याचा कल्पक वापर करून मूर्ती आणि चित्र रूपात देखावा....!


💥आखाडा बाळापूर येथील सार्थ आणि शिवार्थ दारव्हेकर ही दोन बालकं यांनी टाकाऊ वस्तू पासून गड किल्ले तयार केले💥✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी 

तमाम भारतीय मनात ज्यांना आदराचे स्थान आहे, स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेले गड किल्ले हे मनामनात आदर्श आहेत, प्रत्येक किल्ला हा आजही स्वराज्याचा इतिहास सांगतो तिथल्या कणाकणातून स्फुर्ती मिळते, बाल मनात हा जाज्वल्य इतिहास नेहमी तेवत राहावा..... 


आखाडा बाळापूर येथील सार्थ आणि शिवार्थ दारव्हेकर ही दोन बालकं यांनी टाकाऊ वस्तू पासून गड किल्ले तयार केले आहेत कल्पक वापर करून मूर्ति आणि चित्र रूपात देखावा सादर केला शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिव राज्याभिषेक पर्यंतचे अनेक देखावे यात साकारले आहेत शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा देखावा,शिवाजी महाराज बाल सवंगड्यांना एकत्र करून  स्वराज्याच्या गोष्टी सांगणे त्यानंतर बाल शिवरायाचे शहाजी महाराजांच्या देखरेखीखाली प्रशिक्षणाचा प्रसंग,त्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ ,लाल महालातील शाहिस्तेखानाची फजिती, प्रताप गडावरील अफजलखानाचा वध, तोरणा जिंकल्यानंतर शिवरायांचे समाधानी असलेले चित्र, असे अनेक प्रसंग या बालकलाकारांनी साकारले आहेत ,शिवराज्याचा स्वराज्य अभिषेक हा जिवंत देखावा ही याप्रसंगी साकारण्यात आला आहे.

 


वेगवेगळे स्वराज्यातील वेगवेगळे किल्ले तयार करून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली आहे आगोदर किमान दहा दिवस या तयारीला सुरुवात केली  होती  त्यात माती, पुठ्ठा, किल्ला ची माहिती संकलित करणे, किल्ल्याचा नकाशा तयार करणे, मातीचे सैनिक, महाराजांची प्रतिमा, तटबंदी, बुरुज, दरवाजे, तोफा तयार करणे रंगवणे झेंडे तयार करणे ही सर्व कामे ही दोन बालकं अतिशय आवडीने करतात. 


या वर्षी शिवार्थ आणि सार्थ या दोघांनी मिळून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे यात महादरवाजा पासून सुरुवात होते, राजवाडा, राणी महाल, अष्टप्रधान मंडळ वाडे, सिंहासन,दरबार,मुद्रा छापखाना,गुप्तबैठक स्थळ,पालखी दरवाजा,टेहळणी बुरुज,तोफखाना, अंबरखाना,पाणी व्यवस्था,बाजारपेठ, टकमक टोक,हिरकणी बुरुज, जगदीश्वर मंदिर, महारजांची समाधीस्थळ, वाघ्याची समाधी, वसाहत या प्रमुख स्थळांची उभारणी केली आहे या सर्व स्थळाची माहिती चे फलक गडावर लावण्यात आले आहेत यामुळे या छोट्याशा प्रतिकृती मुळे रायगडावरची सफर केल्याचे समाधान किल्ला पहायला येणाऱ्या बच्चे कंपनीला होत आहे.

आजपर्यंत किल्ल्याची उभारणी त्यांचे गाव पोत्रा, येथे केली आहे  येथे उभारणी केली आहे, या सर्व ठिकाणी त्याच्या उपक्रमाचे लहान-मोठ्या कडून दरवर्षी कौतुक होते त्याचे वडील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर हें देखिल एक उत्कृष्ट चित्रकार आहेत त्यामुळे या मुलांना नेहमीच चांगले मार्गदर्शन वडिलांकडून मिळते असे उपक्रम हें बालक नेहमीच करतात त्यामुळे त्याचे सर्वाकडून कौतुक केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मुलांच्या सृजनात्मक निर्मितीस आपल्या लेखनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रसिद्ध दिली आहे🌸🌸🌸🙏🙏🙏 मन:पूर्वक धन्यवाद!!!

    उत्तर द्याहटवा