💥मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे महिलांच्या पुढाकारातुन शिवजयंती ऊत्साहात साजरी...!


💥यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.नंदाताई डोफेकर आणी एपीआय मंजुषा मोरे यांची प्रमुख उपस्थिती💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे महिलांनी पुढाकार घेवुन विविध सामाजिक ऊपक्रम साजरे करुन छञपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करुन मानवंदना दिली.यावेळी जि.प.सदस्या सौ.नंदाताई डोफेकर आणी एपीआय मंजुषा मोरे यांची प्रमुख ऊपस्थीती होती.


          महिलांचे संघटन करुन त्यामाध्यमातुन विविध समाजपयोगी ऊपक्रम साजरे करुन सामाजिक कार्य सतत करणार्‍या शेलुबाजार येथील महिला मंडळाने यावर्षिची स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांची जयंती विविध ऊपक्रम राबवुन साई नगरीमध्ये मोठ्या ऊत्साहात साजरी केली.प्रथमतः शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन आणी वंदन जि.प.सदस्या सौ.नंदाताई डोफेकर आणी पोलीस विभागाच्या मंजुषा मोरे यांच्या ऊपस्थीतीत करण्यात आले.जिजामातेने घडवलेला शिवाजी पुढे स्वराज्य संस्थापक बनवुन रयतेचे राज्य कसे निर्माण केले याविषयी मान्यवरांनी आपल्या भाषणामधुन प्रकाश टाकला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही शिवरायांच्या यशोगाथेला आपल्या भाषणामधुन ऊजाळा दिला.यावेळी चंदा डोफेकर,शालीनी बारड,प्रिया इंगळे,स्वाती इंगळे,कोमल मोरे,सोनल इंगळे,स्मिता डोफेकर,शुभांगी डोफेकर,पुजा लोखंडे,प्रिया राऊत,मालता मनवर,वैशाली बाबुळकर,जया ऊजवने,संगिता बोरकर,मनिषा काटकर,गुड्डु डोफेकर,पुष्पा बन्सोड आदीसह बहूसंख्य महिला आणी गावकर्‍यांचीही ऊपस्थीती होती.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या