💥परभणी-गंगाखेड रस्त्याच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबद्दल खासदार फौजिया खान यांनी घेतला राज्यसभेत आक्षेप...!


💥खासदार श्रीमती खान यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तरावेळी दर्जाहीन कामा बद्दल आक्षेप नोंदविला💥

परभणी (दि.०४ फेब्रुवारी) :  परभणी - गंगाखेड या राज्य मार्गाच्या होणाऱ्या निकृष्ट कामातील गुणवत्तेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तरावेळी आक्षेप नोंदविला.

       या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. परंतु, या सिमेंटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळेच कामातील गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने याबाबत दखल घ्यावी व गुणवत्तेबाबत पाहणी करीत चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या तक्रारींची निश्‍चित दखल घेतली जाईल, चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या