💥शिवसेनेच्या निष्ठेचा आणि विश्वासाचा आणखी एक बुरुज ढासळला....!


💥शिवसेनाप्रमुख यांचे विश्वसनीय सहकारी सुधीर जोशी यांचे दुःखद निधन💥

प्रेक्षकांना आपल्या जागेवर खेळवून ठेवणारा उत्कृष्ट वक्ता म्हणून महाराष्ट्रच नव्हे तर देश सुधीरभाऊ जोशींना ओळखतो ग्रामीण भागातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना अगदी आपलंस आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले सुधीर भाऊ जोशी यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडून जायचं सर्व सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत अत्यंत उत्कृष्ट होती. 

शिवसेना घडवत असताना शिवसेनेची अत्यंत धडाकेबाज युवा नेतृत्वाची त्याकाळची गाजलेली जोडी म्हणजे सुधीरभाऊ जोशी व  श्री दिवाकर रावजी रावते शिवसेनेच्या जडणघडण व संघर्ष यातील अत्यंत रोचक आणि रोमांचक असे कितीतरी किस्से या  जोडी च्या नावावर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.सुधीरभाऊ जोशी यांच्या मध्ये एक निरागस आणि धडाकेबाज कार्यकर्ता होता अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्तृत्व या बळावर ते प्रत्येकाचं मन जिंकून घेत वाणी अत्यंत गोड व भाषा अत्यंत स्पष्ट उच्चदर्जाची मनाला व काळजाला  थेट भिडणारी होती.

शिवसेना नेते सुधीर भाऊंच्या जाण्याने त्या बातमीने आज आपल्याच घरातला अगदी कुटुंबातला सदस्य आपल्याला सोडून निघून गेल्याचे दुःख शिवसैनिकांना झाले सुधीर भाऊ जोशी साहेब यांच्या निधनाची बातमी शिवसेना या चार शब्दावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदना जनक आहे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.शिवसेना पक्षाची ही प्रचंड मोठी न भरून निघणारी हानी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो त्यांच्या चाहत्यांना शिवसेनेला व कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो हे आई भवानी चरणी प्रार्थना करतो....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या