💥मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती राज्यभर उत्साहात साजरी....!


💥मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून पत्रसृष्टीला शुभेच्छा💥

✍️मोहन चौकेकर

मुंबई - आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज राज्यातील बहुसंख्य जिल्हा आणि तालुका पत्रकार संघात साजरी करण्यात आली..बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्त अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी राज्यातील पत्रकार आणि जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.. 

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांचा महनिय व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करून २० फेब्रुवारी रोजी दरवर्षी शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. आज शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने बहुतेक सरकारी कार्यालयात जयंती साजरी झाली नसली तरी मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आवाहनानुसार राज्यभर ही जयंती साजरी करण्यात आली.

जयंती निमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पत्रकारांनी अभिवादन केले..परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यातील पत्रकार संघांनी मोठ्या उत्साहात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी केल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस  संजीव जोशी, खजिनदार विजय जोशी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते.. या घटनेला आज १९० वर्षे झाली आहेत..दर्पणच्या स्मरणार्थ ६ जानेवारी रोजी राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो.. बाळशास्त्री हे पहिले पत्रकारच नव्हते तर मोठे विद्वान होते..समाजसुधारक, आधुनिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असलेल्या बाळशास्त्री यांना 9 भाषा  अवगत होत्या.20 फेब्रुवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे त्यांचा जन्म झाला तर 17 मे 1846 रोजी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांचे निधन झाले....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या