💥पुर्णा नगर परिषदेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी....!


💥नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी बि.नितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले शिवरायांना अभिवादन💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी पुर्णा नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार बि.नितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात यावेळी प्रभारी मुख्याधिकारी बि.नितेशकुमार व नगराध्यक्ष गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उत्तम खंदारे,नगरसेवक शामराव कदम,नगरसेवक दादाराव पंडीत,नगरसेवक ॲड.धम्मानंद जोंधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,शिवसेनेचे मा.शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,रौफ कुरेशी आदींसह नगर परिषदेचे ओ.एस.इमरान,उत्तम कांबळे,नयुम पठाण आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या