💥मराठी वृत्तपत्राचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन....!


💥जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले💥

फुलचंद भगत

वाशिम:-मराठी वृत्तपत्राचे जनक आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्ताने आज २० फेब्रुवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला.यावेळी पत्रकार अनिल वाल्ले,सुनील मिसर,विश्वनाथ राऊत,गणेश भालेराव,डॉ.माधव हिवाळे,श्री.अवताडे तसेच कार्यालयातील कर्मचारी विजय राठोड व अनिल कुरकुटे उपस्थित होते.उपस्थित पत्रकार व कर्मचाऱ्यांनी सुध्दा बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या