💥शिवजयंतीनिमित्त खडकेश्वर येथे भव्य बैलगाडा शंकरपट : शिवसेना जिल्हा व शहर शाखेने केले आयोजन...!


💥२ लाख २१ हजाराच्या बक्षीसांची जंगी लुट💥

फुलचंद भगत

वाशिम - शिवजयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा व शहर शाखेचे आयोजन, शिवसैनिक नितीन मडके यांचा पुढाकार व दात्यांच्या सहकार्यातुन येत्या २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस स्थानिक देवाळा रस्त्यावरील खडकेश्वर येथे भव्य बैलगाडा शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विजयी स्पर्धकांसाठी तब्बल २ लाख २१ हजार रुपयाच्या बक्षीसांची जंगी लुट करण्यात आली आहे. या बक्षीसांमध्ये दत्ताभाऊ लोणसुने, गणेश पवार, नामदेव गोरे, बबन देवकर, विजय वानखेडे, प्रकाश वानखेडे, अजयसिंग ठाकुर, स्व. भाऊराव खरबळकर, सागर गोरे, डॉ. निरगुडे, विठ्ठल इंगोले, संजय ढेगळे, मनिष चिपडे, देवानंद इंगळे, अरुण मडके, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, आशिष इंगोले, नितीन मडके, नगरसेवक अतुल वाटाणे, उमेश मोहळे, नबी सर, संजु वानखेडे, आनंद चरखा, तरण सेठी, राजु घोडीवाले, गोकुल वर्मा, वसंत धाडवे, प्रल्हाद सुर्वे, दत्ता इंगळे आदींनी आर्थिक सहकार्याचा भार उचलला आहे. या शंकरपटातील शोपल्ला प्रकाराची नोंदणी ७०० तर आम जनरल प्रकाराची २५०० रुपये नोंदणी रक्कम आकारण्यात आली आहे. तरी रसिकांनी या शंकरपटात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन आयोजक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नितीन मडके यांच्यासह शेख हसनसेठ, संजय इंगळे, शामराव इंगोले, गणेश इंगळे, संजय वानखेडे, सुधीर इंगोले, राजु मुंदाडे आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या