💥राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा मंगरुळपीर येथे राष्टवादी काँग्रेसकडुन जाहीर निषेध....!


💥माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.२४ फेब्रुवारी) :-राष्टवादी काॅग्रेसचे प्रवक्ता आणी राज्याचे अल्पसंख्यांकमंञी नवाब मलिक यांच्या अटकेचा मंगरुळपीर येथे राष्टवादी काॅग्रेस पक्षाचे महाराष्टप्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ पक्ष निरिक्षक,माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

           केंद्र सरकारने राजकीय आकसापोटी सीडबुध्दीने ईडीच्या माध्यमातुन राष्टवादी काॅग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांना अटक केली ती बाब अतिशय निंदनिय आणी निषेधार्थ आहे.नवाब मलिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे ऊभे आहे.ईडीने सुडबुध्दीने मलिकांना अटक केली याचा मंगरुळपीर येथे राष्टवादी पक्षाकडुन जाहीर निषेध करत प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे.यावेळी राष्टवादी काॅग्रेसचे पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या