💥छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त पोलीस भरती सराव परीक्षेला अभुतपूर्व प्रतिसाद...!

💥सदर परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभुतपूर्व प्रतिसाद ; जवळपास 500 विद्यार्थी व विद्यार्थींनीनी यामध्ये सहभाग घेतला💥

फुलचंद भगत

वाशीम (दि.१९ फेब्रुवारी) : अकोला नाका स्थित सोमाणी करिअर अकॅडमी व जगदंबा अभ्यासिका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन 19 फेबु्रवारी रोजी करण्यात आले.  सदर परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.जवळपास 500 विद्यार्थी व विद्यार्थींनीनी यामध्ये सहभाग घेतला.

सदर परीक्षेच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र पोलीस राजेश बायस्कर, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र किडसे पाटील, मुंबई मनपा सदस्य संजुभाऊ आधार वाडे, एकता पॅनल शिक्षक संघटनेचे विनोद घुगे, भारत लादे, रऊप बेग सर, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, गजानन देवळे पाटील, स्वप्नील वाघ, महेशभाऊ चव्हाण, सुनिल अखंड पाटील, मोहनभाऊ भताने, विशाल बहाकर, संचालक सोमाणीसर, आकाश मुसळेसर, आकाश बिटोडेसर, महेश सावके आदिंची उपस्थिती होती. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व हार्रापण करण्यात आले.  तद्नंतर बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक मुंबई नगरसेवक संजुभाऊ आधार वाडे होते. विशेष अतिथी म्हणून निलेश सोमाणी, सोमाणी सर, आकाश मुसळे, आकाश बिटोडे उपस्थित होते. यावेळी गजानन देवळे पाटील, सुनिल अखंड पाटील यांच्या वतीने प्रथम बक्षिस 5001रूपये, व्दितीय बक्षिस एकता शिक्षक संघटनेच्या वतीने 3001रूपये, तृतिय बक्षिस स्वप्नील वाघ व महेश चव्हाण यांच्या वतीने  2001रूपये, चतुर्थ बक्षीस मोहन भताने व प्रमोद निघोते यांच्या वतीने 1501 रूपये, विशेष प्रोत्साहन पर बक्षिसे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र किडसे पाटील यांच्या वतीने देण्यात आले.  बक्षिसाचे वितरण संजुभाऊ वाडे व निलेश सोमाणी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रथम बक्षीस विभागून पृथ्वीराज जाधव, सौरभ गोडघासे , व्दितीय बक्षिस प्रविण भालेराव, तृतिय बक्षिस तिघांना विभागून विकास पवार, सुनिल चतरकर, दिपक लहाने , चतुर्थ बक्षिस किसन महाले, तर प्रोत्साहनपर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अमोल इंगोले व वैभव भोयर यांना प्रदान करण्यात आला. सर्व विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देवून सत्कार करण्यात आला.  यावेळी संजु वाडे व निलेश सोमाणी यांनी आपल्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी जीवनात लक्ष निश्चित करून प्रगती करावी. स्पर्धा परीक्षेतून आपल्या स्वप्नाची स्पूर्ती करण्याचे आवाहन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या